रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटिका रेखा कोंडे, स्वाती कथलकर, विद्या होडे, सरोज कार्वेकर, स्नेहा कुलकर्णी, मृण्मयी लिमये, जयश्री भणगे यांच्यासह चार ते पाच महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रास्ता पेठेतील गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फलटण मधील आत्महत्या करणाऱ्या डॉक्टर महिलेबाबत असंवेदनशील वक्तव्य केल्याचा आरोप करुन शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या घरासमोर दुपारी सव्वा तीनच्या सुमारास आंदोलन केले. चाकणकर यांनी आत्महत्या करणाऱ्या महिलेबाबत असंवेदनशील वक्तव्य केले असून, त्यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविण्यााचा अधिकारी नाही, असे सांगून शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.

चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, की महिलांचा अपमान करणाऱ्या प्रवक्त्या ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलीस परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×