Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

रास्ता पेठेतील गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई

चंद्रपूर कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध

marathinews24.com

पुणे – शहरातील रास्ता पेठ भागात दहशत माजविणारा, तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुंडाची रवानगी वर्षभरासाठी चंद्रपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी

लकी विलास इनरकर (वय ३३, रा. रास्ता पेठ) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकी इनरकर यांच्याविरुद्ध मारामारी, दहशत माजविणे, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याने एका तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणीने तक्रार देऊ नये म्हणून त्याने तिच्या दुकानाला आग लावली होती. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली इनरकरविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

संबंधित प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी देण्यात आली. त्यानुसार इनरकर याला वर्षभरासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले. समर्थ पोलिसांनी त्याला चंद्रपूर कारागृहात नेले आहे. गेल्या सहा महिन्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुंडाविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×