Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

पुण्यात जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारी

पुण्यात चोरट्यांचा हैदोस, महिलांचे दागिने हिसकावले

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली. वादातून हाणामारी करुन सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई खराडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच महिला जनता वसाहतीत राहायला आहेत.

एसटीत शिरताना जेष्ठ महिलेची सोन्याची पाटली चोरली – सविस्तर बातमी

जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ७१ च्या परिसरात ३० ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास किरकोळ कारणावरुन महिलांमध्ये वाद झाला. वादातून महिलांमध्ये हाणामारी झाली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीला धक्का दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले. आरडओरडा, तसेच शिवीगाळ करुन सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मारामारी केल्याप्रकरणी पाच महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस शिपाई खराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.

शहरात किरकोळ कारणावरुन हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना वानवडी आणि विमानगर भागातील खेसे पार्क परिसरात नुकतीच घडली.

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणावर कोयत्याने वार – सहकारनगर पोलिसांकडून दोघांविरुद्ध गु्न्हा

पुणे – प्रेम प्रकरणाच्या संशयातून तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना तळजाई टेकडी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहित दिलीप साळवे (वय २२, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळवेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित एका कंपनीत डिलिव्हरी बाॅय म्हणून काम करतो. २८ ऑक्टोबर रोजी रोहितच्या मैत्रिणीने त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. रोहित आणि त्याची मैत्रीण दुचाकीवरुन फिरायला बाहेर पडले. तळजाई टेकडी परिसरातील सदू शिंदे स्टेडीयमजवळ आरोपींनी दुचाकीस्वार रोहित आणि त्याच्या मैत्रिणीला अडवले. त्यावेळी एका आरोपीने त्याच्याकडे विचारणा केली. ‘ तू माझ्या बहिणीला संदेश का पाठवितो’, अशी विचारणा केली. ‘तुझ्या बहिणीचा विवाह झाल्याापासून मी संबंध तोडले आहेत’, असे साळवेने आरोपीला सांगितले. त्यानंतर आरोपींनी साळवेशी वाद घालून त्याला शिवीगाळ केली. एका आरोपीने साळवेला पकडले. आरोपी बरोबर असलेल्या साथीदाराने साळवेच्या डाेक्यात कोयत्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक फौजदार जोशी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×