Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

स्पीडब्रेकरच्‍या वादातून तेरा जणांकडून मारहाण

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

मुळशी तालुक्‍यातील सुसगाव पारखेवस्ती परिसरातील घटना

marathinews24.com

पिंपरी – स्पीडब्रेकर कमी करण्यावरून झालेल्या वादातून तेरा जणांनी मिळून दोन जणांना लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्‍या सुमारास मुळशी तालुक्‍यातील सुसगाव येथील पारखेवस्ती परिसरात घडली आहे. तर याच्‍या परस्‍पर विरोधी गुन्‍हाही दाखल करण्‍यात आला आहे.

तब्बल ४६ लाख ५० हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात – सविस्तर बातमी

पहिल्‍या गुन्‍ह्यात गणेश एकनाथ पारखे (वय ३२, पारखेवस्ती, सुसगाव, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्‍य महिला व अल्‍पवयीन बालकांसह एकूण १३ जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. सरगम महेंद्र ससार (वय ३६, पारखेवस्ती, सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पारखेवस्ती ते बांदलवस्ती दरम्यान सार्वजनिक रस्त्यावरील स्पीडब्रेकर जेसीबीने कमी करण्यावरून वाद झाला. आरोपींनी एकत्र येऊन महेंद्र राम ससार व अशोक भास्कर कादे यांना दगड, स्टील दांडे आणि लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

याच्‍या परस्‍पर विरोधी दक्ष राजेंद्र पारखे (वय १७, सुसगाव) यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार महेंद्र राम ससार, सरगम महेंद्र ससार, उमा भास्कर कादे, अशोक भास्कर कादे (सर्व रा. सुसगाव, पुणे) यांच्‍या विरोधत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने स्पीडब्रेकर काढत असताना साक्षीदारांनी विरोध केला. त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी महेंद्र ससार याने दगड फेकून साक्षीदारांच्या डोक्यात मारहाण केली तसेच दवाखान्यात जाताना त्यांना अडवले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×