Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

कोथरूड, पाषाण भागात घरफोडी

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला

साडेसोळा लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे – शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, कोथरूड आणि पाषाण परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी साडेसोळा लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.

पादचारी तरुणीशी अश्लील कृत्य – सविस्तर बातमी

कोथरूड भागातील आझादनगर भागात असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आझादनगर भागातील पद्मनाभ सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (१ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. रविवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

पाषाणमधील सुतारवाडी भागात एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि कुटुंबीय सुतारवाडी परिसरातील एका सदनिकेत राहायला आहेत. २७ ऑक्टोबर रोजी तरुण आणि त्याचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यानी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून एक लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण सहा लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.

दिवाळीत अनेकजण परगावी जातात. दिवाळीत शहरात बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. दिवाळीनंतर शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र कायम आहे. चोरट्यांनी गेल्या पंधरा दिवसात लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे.

हाॅटेल कामगारांकडून रोकड चोरी

हाॅटेल कामगाराने गल्ल्यातील ३५ हजार रुपयांची रोकड, मोबाइल संच, लॅपटॉप असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत एका हाॅटेल चालकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे लोहगावातील निंबाळकर गर परिसरात हॉटेल आहे. त्याठिकाणी तीन कामगार काम करत होते. कामगार हाॅटेलमध्ये झोपायचे. कामगारांनी चोरी केल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×