पुण्यातील हाॅटेलमध्ये लागलेल्या आगीत तरुणाचा मृत्यू

इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून पडल्याने मजुराचा मृत्यू

सोमवार पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – हाॅटेलमध्ये खोलीत लागलेल्या आगीत तरुणाचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. सोमवार पेठेतील एका हाॅटेलमध्ये ही घटना घडली. मोहित भूपेंद्र शहा (वय ३२, रा. दौंड. जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शहा हा एका सनदी लेखापालाकडे काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्याचा घटस्फोट झाला आहे.

शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषानो ४७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

मिळालेल्या माहितीनुसार, शहाने खूप दारु प्यायल्याने त्याच्या मित्राने त्याला सोमवार पेठेतील हाॅटेलमध्ये गुरुवारी रात्री झोपण्यास सांगितले. या हाॅटेलमध्ये खोली त्याने घेतली होती. गुरुवारी रात्री तो तेथे झोपला असताना शुक्रवारी सकाळी हाॅटेलच्या खोलीचा दरवाजा न उघडल्याने हाॅटेलमधील कामगारांना संशय आला. दुपारी बाराच्या सुमारास खोलीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. हाॅटेलमधील कामगारांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा तो बेशुद्धावस्थेत पडला होता. त्याचा आगीची झळ पोहोचल्याने त्याचा पाय भाजला होता. त्याला तातडीने ससुून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अशी माहिती समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा खोलीतील गादी जळाली होती. सिगारेटचे जळते थोटूक नशेत असलेल्या शहाने गादीवर टाकल्याने आग लागली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने गुदमरुन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलीस निरीक्षक गित्ते यांनी व्यक्त केली. शवविच्छेदन अहवालात शहा याच्या मृत्यूमागचे निश्चित कारण समजेल. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×