समाजकल्याण आयुक्तांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस अभिवादन केले
Marathinews24.com
पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पुतळ्यास समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र पवार, उपआयुक्त विजयकुमार गायकवाड, प्रादेशिक उपआयुक्त, वंदना कोचुरे, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूरचे उपआयुक्त रविंद्र कदम पाटील, सहायक आयुक्त विशाल लोंढे, श्री मारकड, हरेश्वर डोंगरे, उपस्थित होते.