Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

शासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक पदांसाठी माजी सैनिकांची भरती

सुरक्षा पर्यवेक्षक व सुरक्षा रक्षक पदाकरीता अर्ज करण्याचे सैनिक कल्याण विभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती, येथे २ सुरक्षा पर्यवेक्षक महिला, ७० सुरक्षा रक्षक पुरुष व ४० सुरक्षा रक्षक महिला आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, बारामती येथे २ सुरक्षा पर्यवेक्षक पुरुष व ५६ सुरक्षा रक्षक पुरुष हि पदे भरण्यासाठी माजी सैनिक, माजी अर्ध सैनिक बल, माजी सैनिक पत्नी/विधवा व माजी सैनिक पाल्य यांच्यासाठी भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

नियुक्तीच्या तारखेला इच्छुक उमेदवारांमध्ये माजी सैनिकाचे वय ३५ ते ५८ वर्ष, माजी अर्ध सैनिक बलातील उमेदवाराचे वय ३५ ते ५५ वर्ष, माजी सैनिक पत्नी/विधवा यांचे वय २१ ते ४५ वर्ष व माजी सैनिक पाल्याचे वय ३५ ते ५५ वर्ष यामधील असावे. सर्वसाधारणपणे सन्मानजनक वेतन (विभागानुसार), प्रोविडंट फंड (PF), जीवन विमा, ग्रॅज्युएटी (Gratuity), ई. एस. आय. (ESI). नियमानुसार स्थायी रजा १४ दिवस व प्रासंगिक रजा ८ दिवस मिळतील.

इच्छुक माजी सैनिकांनी अधिक माहितीसाठी पर्यवेक्षक श्री. यशवंत बांदल ९४२२८३०४७५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पुण्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×