Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

हॉटेलमध्ये नव्हे थेट शेतात हुक्काबार पार्टी

चतुःशृंगी पोलिसांकडून कारवाईचा बडगा

marathinews24.com

पुणे – हॉटेलमध्ये नव्हे तर चक्क शेतात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या हुक्का बारवर चतुःशृंगी पोलिसांनी कारवाई केली. त्याठिकाणाहून २० हुक्का पॉट, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर असा ४८ हजार ६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील फार्म कॅफे सर्व्हे नंबर २२४ मध्ध्ये करण्यात आली.

गुंतवणूकीवर परताव्याचे आमिष, १२ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

चतुःशृंगी पोलीस ८ नोव्हेंबरला हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना पथकाला औंध-बाणेर लिंक परिसरातील हुक्का बारची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रस्त्यापासून १०० ते २०० मीटर अंतरावरील शेतात छुप्या पद्धतीने हुक्का बार सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.

हुक्का पार्लरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची बंदी असतानाही पाचही आरोपींकडून नियमांचे उल्लंघन करीत ग्राहकांना हुक्का पुरविला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार याप्रकरणी पाचजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे, एपीआय अनिकेत पोटे, बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×