डेक्कन परिसरातील रेस्टॉरंटमध्ये दरोडा

डेक्कन परिसरातील रेस्टॉरंटमध्ये दरोडा

मध्यरात्री कोयतेधारी टोळीने घातला राडा

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती डेक्कन परिसरातील अनंत रेस्टॉरंटमध्ये कोयताधारी टोळक्याने राडा घालून तोडफोड केली . तसेच मध्यरात्री दीडच्या सुमारास दरोडा टाकून लुटमार केल्यामुळे खळबळ उडाली आले. लुटमारीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सीसीटीव्ही फुटेनुसार आरोपींच्या शोधार्थ स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पोलिसांनी शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन परिसरात अनंत रेस्टॉरंट असून, बुधवारी दि. १९ मध्यरात्री दीडच्या सुमारास कोयताधारी टोळक्याने आतमध्ये प्रवेश केला. काउंटरवर असलेल्या व्यक्तीला त्यांनी मारहाण करीत कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर गल्लातील रोकड घेउन कोयताधारी टोळके पसार झाले. दरम्यान, लुटमारीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत वैâद झाला असून, घटनेमुळे रेस्टॉरंट मालक-कामगारांंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. टोळक्याने रेस्टॉरंटची काचही फोडल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस, गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधार्थ काम करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×