Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन

कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते आहेत यादव

marathinews24.com

पुणे – कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च अशा परमवीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आलेले कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते गणरायाची आरती देखील झाली.

रविवारी १ हजार ४०० परीक्षा केंद्रावर होणार टीईटीची परीक्षा – सविस्तर बातमी 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांचे स्वागत व यशोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, मंगेश सूर्यवंशी, रोहित लोंढे, यांसह संजय भोसले, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते.

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव म्हणाले, ‘दगडूशेठ’ हे असे गणपती बाप्पा आहेत, जे भक्ताच्या नावाने ओळखले जातात. देवतांमध्ये गणेशाचे स्थान सर्वोच्च असून करुणा, रिद्धी, सिद्धी, ज्ञानाचे ते प्रतीक आहेत. वेगळ्या प्रकारची शांती दगडूशेठ मंदिरात मिळते. गणपती बाप्पाने जे ज्ञान दिले आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल, असा माझा प्रयत्न आहे. पर्यावरणासह मानवतेला नवी चेतना देणारा दगडूशेठ गणपती ट्रस्ट आहे. भारतवासीयांवर गणेशाची कृपा सदैव राहो आणि सर्वत्र सुख शांती नांदो, अशी प्रार्थना त्यांनी गणेश चरणी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×