Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

रविवारी १ हजार ४०० परीक्षा केंद्रावर होणार टीईटीची परीक्षा

राज्यात ४.७५ लाख परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या रविवार २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १ हजार ४२३ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा परिषदेमार्फत उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती परिषदेच्या अध्यक्षांनी कळविली आहे.

शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाच्या समावेशासाठी प्रयत्नशील – सविस्तर बातमी

परीक्षेच्या पेपर १ साठी २ लाख ३ हजार ३३४ तर पेपर २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ असे एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षार्थींना ओळख पटवूनच प्रवेश देण्यात येईल. परीक्षा दालनामध्ये मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅलक्युलेटर इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाता येणार नाही.

सर्व परीक्षा दालनामध्ये, परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर व केंद्र संचालकांच्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. परीक्षेसंदर्भात समाजमाध्यम व प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.inhttp://mahatet.in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे, असेही कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×