Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

साताऱ्यात गुन्हे करुन पसार झालेला अटकेत

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात कारवाई

marathinews24.com

पुणे – सातारा शहरात दोन गुन्हे करुन पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

फ्लॅटचे कुलूप तोडून सात लाखाचा ऐवज चोरीला – सविस्तर बातम्या

निखील अशोक काळे (वय २२, रा. मातंग वस्ती, कोडोली, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सातारा शहर परिसरात काळे याने दोन गुन्हे केले होते. गुन्हे केल्यानंतर तो पसार झाला होता.

सातारा पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. पुणे गुन्हे शाखेच्या दराेडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी साईकुमार कारके आणि बाळू गायकवाड हे स्वारगेट परिसरात गस्त घालत होते. काळे स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात थांबल्याची माहिती कारके यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. काळे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याला सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे, सहायक निरीक्षक वर्षा कावडे, बाळू गायकवाड, साईकुमार कारके, महेश पाटील, अमित गद्रे, नारायण बनकर, रिहाना शेख, साधना पवार यांनी ही कामागिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×