Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

थकीत वेतनासाठी लाच स्वीकारली, इंदापूरात लिपिकाविरुद्ध गुन्हा

शिक्षण उपनिरीक्षकाकडे सापडले १ लाख २० हजार रुपये

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – थकीत वेतन मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या इंदापुरातील ओैद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लिपिकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. अनमोल शिवाजी शिंगे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंगेला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

उमराटी’ प्रकरणात होणार सराईतांची झाडाझडती – सविस्तर बातमी 

ओैद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वसतिगृह अधीक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील वेतन थकीत असल्याने वसतिगृह अधिक्षकांनी लिपिक शिंगे याची भेट घेतली. थकित वेतन मिळवून देण्याची विनंती केली. वेतन मंजुरीसाठी शिंगे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने तडजोडीत दोन हजार रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. सोमवारी दुपारी ओैद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सापळा लावून तक्रारदाराकडून लाच घेताना शिंंगे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×