Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

उमराटी’ प्रकरणात होणार सराईतांची झाडाझडती

उमराटी’ प्रकरणात होणार सराईतांची झाडाझडती

मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या उमराटी गावात पोलिसांनी छापा टाकून केली होती कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील गुंड टाेळ्यांना मध्यस्थांमार्फत पिस्तुलांची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर आता यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गु्न्हा दाखल झालेल्या सराईतांची चौकशी केली जाणार आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेजवळ असलेल्या उमराटी गावात पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली हाेती.. पोलिसांनी पिस्तूल, मॅगझीन, पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुट्टे भाग, अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधून काढले – सविस्तर बातमी 

सनीभाई चावला (वय ३७), जसबिरसिंग प्रकाशसिंग चावला (वय २२), प्रवीणसिंग उत्तमसिंग टकराना (वय २२), राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा (वय ३६), अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला (वय २७), नानाकसिंग अजितसिंग बर्नाला (वय ३२), गुरुचरणसिंग बर्नाला (वय २३, सर्व रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

उमरटीतील कारागिरांनी सहा ते सात वर्षात सराईतांना देशी बनावटीच्या ७०० ते ८०० पिस्तुलांची विक्री केल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या उमराटीतील कारागिरांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांनी मध्यस्थांमार्फत पुण्यातील गुंड टोळ्यांतील सराइतांना पिस्तुलांची विक्री केली आहे. शरद मोहोळ, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींनी उमराटीतील कारागिरांनी तयार केलेल्या पिस्तुलांचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. शहरात यापूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यात देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर केला आहे. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराइतांना पोलिसांनी अटक केली होती. तपासाच्या अनुषंगाने असे गुन्हे दाखल असलेल्या सराईतांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

पुणे पोलिसांच्या पथकाने उमराटी गावात शनिवारी पहाटे छापा टाकला. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली १०५ पोलिसांनी कारवाई केली. यापूर्वी स्थानिक कारागिरांनी पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी छापा टाकण्यापूर्वी तयारी केली होती. ड्रोन कॅमेरे, गॅस गन, बिनतारी संदेश यंत्रणा, शीघ्र कृत्ती दल (क्विक रिस्पाॅन्स टीम) या कारवाईत सहभागी झाले होते. उमराटी गावातील कारागिर पिस्तूल विक्री करण्यापूर्वी खात्री करायचे. सोशल मीडियावर संपर्क सुविधेद्वारे पिस्तूल खरेदीदारांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×