Breking News
धक्कादायक…प्रेमाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचारपुण्यातील नवले पुलाजवळ धावत्या इलेक्ट्रिक कारला आगगर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आणि गर्भपात कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस आणि आरोग्य विभागाने कार्यप्रणाली तयार करावीवडिलांच्या खूनाचा घेतला बदला, टोळीला अटकऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणीराजा पंढरीचा’ भक्तिमय संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमाऊली’ नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा भावस्पर्शी आविष्कारबंडगार्डन पोलीस ठाण्यातून आरोपी झाला पसारपोलीस असल्याची बतावणी करुन १ कोटींची रोकड लूटण्याचा प्रयत्नव्यावसायिकाकडील रोकड लुटणारे गजाआड

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधून काढले

सनसिटी रस्त्यावर तरुणाच्या खून प्रकरणी ३ अल्पवयीन ताब्यात

फुरसुंगी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून मुलीला शोधले

marathinews24.com

पुणे – लग्नाच्या आमिषाने पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला फुरसुंगी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शोधून काढले आहे. मुलीला तिच्या आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी मुलीला पळवून नेणाऱ्यासह त्याला साथ देणाऱ्या सावत्र आईला अटक केली आहे.

येरवड्यात २१ लाखाचा गुटखा जप्त – सविस्तर बातमी

रमेश मसनाजी पिट्टलवाड (वय २५ रा. धगनगर वस्ती उरूळी देवाजी, मुळ. नादेंड) आणि मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (वय ३५, रा. साखरे वस्ती हिंजवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश पिट्टलवाड पुण्यात राहत असताना, त्याची १३ वर्षीय अल्पीयीन मुलीसोबत ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवून त्याने १८ ऑक्टोबरला मुलीला पळवून नेले होते. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटूंबियांनी फुरसूंगी पोलिसात तक्रार दाखल केली. अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी रमेशची सावत्र आई मुक्ताबाई हिने त्यांना प्रवास खर्च देवून हैद्राबादला पाठवल्याचे समोर आले.

पोलीस हैद्राबादला पोहले मात्र, त्यापूर्वीच रमेश मुलीला घेवून पसार झाला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून रमेश आणि मुलगी उत्तर प्रदेशातील बामणौली, ता.बडोत, जि. बागपत येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे , पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव यांचे पथक उत्तर प्रदेशात दाखल झाले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार दिवस तपास केल्यानंतर फुरसूंगी पोलिसांना रमेश व अल्पवयीन मुलगी शेधण्यात यश आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुण्यात आणले. एक महिना तपास करून फुरसूंगी पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तिच्या ताब्यात दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×