Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

येरवड्यात २१ लाखाचा गुटखा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – छुप्या पध्दतीने गुटखा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराचा अंमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. येरवड्यातील नाईकनगरमधील गोडावुनमध्ये छापा टाकून २० लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीचा गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट (२५, रा. सर्वे. नंबर १४, नाईकनगर, येरवडा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे..याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण – सविस्तर बातमी

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाईक नगरमधील वेद प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गोडावुनमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मि‌ळाली होती. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, सुनील महाडीक, ऋषीकेश ताकवणे संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने सोमवारी गोडावुनवर छापा टाकला. छाप्यामध्ये पोलिसांना गोडावुनमध्ये २० लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त केला. आरोपी जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट याला ताब्यात घेतले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×