Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

लोणी काळभोरमधील घटना

marathinews24.com

पुणे – शेजारी राहणार्‍या मुलीशी प्रेमविवाह केल्याने मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या ८ नातेवाईकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कुख्यात श्वेतांग निकाळजेसह दोघांना अटक – सविस्तर बातमी

अरुण छबु चव्हाण (वय ४०, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले आहेत. राज दादा शितोळे (वय २१), शेखर दिलीप चव्हाण (वय ३०), रोशन दिलीप चव्हाण (वय २७), दिलीप पंडीत चव्हाण (वय ६८), आईनाबाई दिलीप चव्हाण (वय ६५), पुजा शेखर चव्हाण (वय २५), मनिषा दादा शितोळे (वय ३३) उज्वला बाळु सावंत (वय २७, सर्व रा. चव्हाण वस्ती, थेऊर) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण चव्हाण यांचा मुलगा राहुलने शेजारी राहणार्‍या आईनाबाई चव्हाण यांची नात साक्षी सावंत हिच्याबरोबर २० मे २०२५ रोजी प्रेमविवाह केला होता. आईनाबाईचा लग्नाला विरोध असल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वी भांडणे झाली होती. त्यामुळे चव्हाण यांनी राहुल व साक्षी यांना छत्रपती संभाजीनगरला पाठविले होते. अरुण हे २२ नोव्हेबरला सकाळी साडेसात वाजता दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडले. त्यावेळी आईनाबाईने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अरुण यांनी तिला समजावून सांगत असताना तिने कानाखाली मारुन गचंडी पकडून आरडाओरडा सुरु केला.

घरातून आलेल्या शेखरने लोखंडी गजासह नातू राजू कोयता घेऊन आला. दिलीप व नातू राज शितोळे हे दांडके घेऊन धावत आले. शेखरने डोक्यामध्ये रॉड मारला. राजने ‘आज याला जिवंतच सोडत नाही, असे म्हणून कोयता डोक्यात मारला. अरुणच्या डोक्यातून रक्त येऊ लागले़ तरी दिलीप, रोशन यांनी लाकडी दांडक्यांनी पाठीवर, पोटावर मारहाण केली. पुजा, मनिषा, उज्वला यांनी रस्त्यावर पडलेले दगड उचलून त्यांना दगडाने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×