Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

कुख्यात श्वेतांग निकाळजेसह दोघांना अटक

२ पिस्टल जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे घेण्यासाठी तरूणाचे घरातून अपहण त्याच्या डोक्याला लावून ठार मारण्याची धमकी देणार्‍या कुख्यात श्वेतांग निकाळजे याच्यासह दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ पिस्टल जप्त केले आहेत. श्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) आणि ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.

उरळी देवाची परिसरात २० वाहनांची तोडफोड – सविस्तर बातमी

तक्रारदार तरूणाचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्याने व निकाळजेने एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. त्याचे पैसे द्यावेत, यासाठी शिवा मुत्याळचे लग्न असताना दोन साथीदारांच्या मदतीने र्श्वेतांगने ८ नोव्हेबरला रात्रीच्या सुमारास घरातून अपहरण केले.भोर रोडवर उतरुन त्याच्याकडील दोन पिस्टल काढून ते फिर्यादीच्या डोक्यावर लावून तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू अशी धमकी दिली होती. इतर दोघा साथीदारांनी ‘तू भाऊचे ऐकत नाहीस तुझ्या डोक्यात कोयता टाकतो,’ अशी धमकी दिली होती. त्यांच्या तावडीतून ते पळून गेल्याच्या रागातून त्या तिघांनी त्यांना शिवाजीनगर येथे गाठून मारहाण करुन पिस्टल लावून धमकाविले होते.

आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी यांनी र्श्वेतांग निकाळजे आणि ओम गायकवाड यांची माहिती काढून त्यांना अटक केली. त्याच्याकडून २ पिस्टल, मोटार असा ६ लाखांचा ऐजव जप्त केला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×