Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून दागिने लंपास

पुण्यात ऐन दिवाळीत दुचाकीस्वार चोरटे सुसाट

चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती तुळशीबागेत महिलांच्या पिशवीतून दागिने आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून रोकड आणि मंगळसूत्र असा ७९ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोंढव्यात घरपोडी; सहा लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५६ वर्षीय महिला मूळच्या अहिल्यानगरमधील भिंगार परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी (२३ नाेव्हेंबर) नातेवाईकांसह दुपारी साडेतीनच्या सुमारास खरेदीसाठी आल्या होत्या. शनिपार चौकातून त्या तुळशीबागेत खरेदीसाठी निघाल्या होत्या. तुळशी बागेतील एका पर्सच्या दुकानाजवळ गर्दी होती. गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून पाच हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ७९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ऐवज चोरीला गेल्याचे काही वेळानंतर लक्षात आले. त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस कर्मचारी मोरे तपास करत आहेत.

काही महिन्यांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारचे पाच ते सहा गुन्हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. मध्यंतरी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून दागिने चाेरणाऱ्या महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली होती. तुळशीबागेतील गैरप्रकार, तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी तुळशीबागेतील व्यापाऱ्यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×