शेअर मार्केट परताव्याचे आमिष पडले ३ लाखांना

महिलेला कमी गुंतवणूकीवरील नफा पडला ५२ लाखांना

बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला ३ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ४ एप्रिल ते २७ जून कालावधीत घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने नांदेडसिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेतून बोलत असल्याची केली बतावणी, महिलेला गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सायबर चोरट्याने ४ एप्रिलला फोन करून शेअर मार्केट गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादित केल्यानंतर गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार तक्रारदाराने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघ्या दोन महिन्यांत सायबर चोरट्याने त्यांना ३ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून गंडा घातला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×