Breking News
जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून प्रारंभ; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना‘दगडूशेठ’ गणपतीला ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्यपुण्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्नपुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

२ लाख रूपये दे नाहीतर फोटो व्हायरल करेल

२ लाख रूपये दे नाहीतर फोटो व्हायरल करेल

महिलेविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – देवदर्शनावेळी झालेल्या ओळखीतून एका महिलेने विवाहित तक्रारदारासोबत ओळख वाढविली. त्यानंतर त्यांना भाउ मानत असल्याचा दिखावा करीत काशी विश्वनाथला नेले. त्यानंतर पुण्यात आल्यानंतर सोन्याची अंगठी देउन लग्नाचा तगादा लावला. नाहीतर २ लाख दे, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही; सहकाऱ्याला धमकी देणारा पोलीस निलंबित – सविस्तर बातमी 

गौरी प्रल्हाद वाजंळे (वय ४२, रा. वनाज, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्वनाथ कदम (वय ४७ रा. चंदगड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कदम हे कोल्हापूरमधील चंदगड येथील रहिवाशी आहेत. मार्च २०२५ मध्ये तुळजापूरात त्यांची आरोपी गौरीसोबत ओळख झाली. त्यानंतर तिने ओळखीचा गैरफायदा घेउन भाउ मानत असल्याचा दिखावा केला. कदम यांना स्वतःबरोबर जबरदस्तीने फिरण्यास भाग पाडले. त्यानंतर तिने कोथरूडमध्ये बोलावून सोन्याची अंगठी देउन लग्न करण्याचा तगादा कदम यांच्यामागे लावला. २ लाख रूपये दे, नाहीतर आपले फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. मी अशाच प्रकारे अनेकांना फसवले आहे, लोक मला घाबरून पैसे देतात अशी धमकी तिने तक्रारदाराला दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×