Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

‘मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही; सहकाऱ्याला धमकी देणारा पोलीस निलंबित

‘मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही; सहकाऱ्याला धमकी देणारा पोलीस निलंबित

पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित करण्याचे दिले आदेश

marathinews24.com

पुणे – येरवडा कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात येणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही’, अशी धमकी देऊन सहकारी पोलीस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. केशव महादू इरतकर असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

एरंडवणेतील उपाहारगृहातून रोकड लुटणारे गजाआड – सविस्तर बातमी 

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांची येरवडा कारागृहातून सुनावणीसाठी नेण्यात येणाऱ्या कैद्यांच्या बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी इरतकर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहे. ११ नोव्हेंबर रोजी इरतकर आणि सरकारी पोलीस कर्मचारी येरवडा कारागृहातून कैद्यांना आणण्यासाठी गेले होते. त्याच्यासोबत पोलीस कर्मचारी संदीप नाळे बंदोबस्तास होते. त्यावेळी इरतकर आणि नाळे यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. ‘ तुम्ही निवृत्त सैनिक काही कामाचे नाहीत. माझ्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. मी पोलीस आयुक्तांना घाबरत नाही’, अशी धमकी इरतकर याने नाळे यांना दिली. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक धायगुडे यांनी त्याला समाजवून सांगितले. तेव्हा इरतकरने नाळे यांना शिवीगाळ केली. रस्त्यावर पडलेला दगड उचलून जीवे मारण्यााची धमकी दिली.

इरतकर याच्या वर्तुणकीबाबतचा अहवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांना पाठविला. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात आली. पोलीस कर्मचारी असल्याने कायद्याची माहिती आहे. सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर कसे वागावे, याची माहिती असताना सार्वजनिक ठिकाणी इरतकर याने केलेले वर्तन पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आहे, तसेच त्याचे वर्तन अशोभनीय असल्याने पोलीस उपायुक्त शिवणकर यांनी त्याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×