Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

येरवड्यात वाहनांची तोडफोड करणारा गुंड अटकेत

येरवड्यात वाहनांची तोडफोड करणारा गुंड अटकेत

येरवडा पोलिसांनी केली अटक 

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाला येरवडा पोलिसांनी अटक केली. समीर शब्बीर शेख (वय २७, रा.जयजवाननगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा सराईत असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका), झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली होती. ‘मकोका’ कारवाईत न्यायालायने त्याला जामीन मंजूर केला होता.

येरवड्यात कपडे चोरणारी महिला अटकेत – सविस्तर बातमी 

जामीन मंजूर झाल्यानंतर तो पुन्हा येरवडा भागात आला. त्याने दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड केल्याची नुकतीच घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. शेख याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. पसार झालेला शेख हा लोहगाव भागात मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड यांनी खबऱ्याने दिली.

त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून शेख याला पकडले. दहशत माजविणे, तसेच एकाबरोबर झालेल्या भांडणातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली त्याने दिली.परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक विजय फटांगरे, प्रदीप सुर्वे, महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, संदीप जायभाय यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×