मला तुम्ही खूप आवडता म्हणत केला महिलेचा विनयभंग

बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन विनयभंग

तरुणाविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मला तुम्ही खूप आवडता असे म्हणत महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार शिवाजी ओळसे (वय २६, रा. बॉक्स ८, पिझा ऑफीस, चांदणी चौक) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिक्षण उपनिरीक्षकाकडे सापडले १ लाख २० हजार रुपये – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रोडवरील मेट्रो स्टेशन परिसरात २५ नोव्हेंबरला दुपारी पावणे तीनच्या सुमारास ओंकार ओळसे हा पीडितेचा पाठलाग करत होता. त्यावेळी आरोपीने ‘मी आता तुमच्याकडे बघायचे पण नाही का? मला तुमच्या सोबत बोलायचे आहे. तुम्ही खाली पार्किंगमध्ये आल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. मला तुम्ही खूप आवडता’ असे म्हणत त्याने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी नोटीस बजावली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×