जबरी चोरी, दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी
Marathinews24.com
पुणे – नागरिकांचे मोबाइल हिसकावून गायब होणार्या नोनियॉ गँगचा खडकी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. त्यांच्याकडून ८ लाख रुपय किंमतीचे तब्बल ३० मोबाइल जप्त केले आहेत. टोळीने पुणे, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी लुटमार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले उपस्थित होते.
अभिषेक राजकुमार महता(वय २२ रा. बिहार) दिनेश राजकुमार नोनिया (वय १८ रा. कटियारा बिहार ) रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया (वय १९ रा. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड) राजेश धर्मपाल नोनियाँ (वय १८ रा. जि बर्धमान, पश्चिम बंगाल) सचिन सुखदेव कुमार (वय २० रा. साहेबगंज, झारखंड ) उजीर सलीम शेख (वय १९ रा. अहमदाबाद, जि कटियारा बिहार) अमिर नुर शेख (वय १९ रा. झारखंड) सुमित मुन्ना महातोकुमार (वय १९ रा. झारखंड ) कुणाल रतन महातो (वय २१ रा. जि कटियारा बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने १४ एप्रिलला पुणे पोलीस बंदोबस्तात असताना संधीचा फायदा घेवून खडकी पोलीस ठाणे हद्दीतील वाकडेवाडी जुना पुणे मुंबई हायवे वरील रोडवरील भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीने एक टोळी दबा धरुन बसली असल्याची माहिती तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांना मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी शिताफीने यशस्वी छापा टाकून पाठलाग करीत ६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी पळून गेलेल्या तिघांनाही २४ तासात अटक केली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे ८ लाख रूपये किंमतीचे ३० मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळक्याने पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मोबाईल चोरी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.
सर्व चोरटे १८ ते २० वयोगटातील, रेल्वेने आले पुण्यात
अटक केलेले आरोपी १८ ते २० वयोगटातील असून, ते बिहार, झारखंड, पश्मिम बंगाल, झारखंडमधून पुण्यात रेल्वेने आले होते. विविध ठिकाणी त्यांची भेट होउन ओळख झाली होती. पैसे कमविण्यासाठी त्यांनी लुटमारीला सुरुवात केली. पुणे, पिंपरी-िंचचवडसह विविध शहरात त्यांनी मोबाइल चोरीसह इतर गुन्हे केले होते. खडकी परिसरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना त्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी विठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, तपास पथक प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, संदेश निकाळजे, आश्विनी कांबळे, अशिष पवार, सुधाकर राठोड, अनिकेत भोसले, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शशांक डोंगरे, प्रताप केदारी, गालीब मुल्ला, प्रविण गव्हाणे, शिवराज खेड, मनिषा गाडे, तनुजा पाटील यांनी केली.
मोबाइल हिसकाविण्यात पटाईत असलेल्या नोनिया गँगला अटक केली आहे. संबंधित सर्व चोरटे रेल्वेने पुण्यात आले होते. त्यानंतर विविध गँगमधील साथीदारांनी एकत्रित येउन लुटमार, जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे केले. पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असताना त्यांना पकडण्यात आले आहे. – दिग्विजय चौगले, पोलीस उपनिरीक्षक, तपास पथक प्रमुख