Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

एनडीएन पाषाण रस्त्यावर बिबट्या आढळला ? व्हिडिओ व्हायरल

एनडीएन पाषाण रस्त्यावर बिबट्या आढळला ? व्हिडिओ व्हायरल

वनविभागाकडून खातरजमा करण्याचे काम सुरू

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात बिबट्या आढळल्याची चर्चा असून, सीसीटीव्ही फुटेजसह फोटो व्हायरल केले जात आहेत. विमानतळ, औंधनंतर आता एनडीए पाषाण रस्त्यावर बिबट्याने सैर केल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. याप्रकरणी प्रत्यक्षात वनविभागाकडून सोमवारपर्यंत (दि.१) बिबट्या आढळल्याची घोषणा केलेली नाही. मात्र खबरदारीच्या उपाय म्हणून वनविभागाने बिबटच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅपकॅमेरा लावण्याचे काम सुरू आहे. तसेच बिबट्याला जेरबंद करण्याचे प्राधान्य देण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण – सविस्तर बातमी 

एनडीए- पाषाण मुख्य रस्त्यावरील हॉटेल डी पॅलेस परिसरात शनिवारी (दि. ३० ) रात्री साडेबाराच्या सुमारास बिबट्या पाहण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज वनविभागाकडे पाठविले आहे. त्यानुसार आता वनविभागाकडून खातरजमा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेषतः नागरिकांनी अनावश्यकपणे रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांना घराबाहेर एकटे सोडू नये. परिसरात हालचाल करताना सतर्क राहावे. बिबट्या आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा पोलीस प्रशासनास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाकडून पौड रेंजमध्ये यंत्रणा कार्यन्वित

बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज बावधन खुर्द गावातील (पौड रेंज )मधील आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेले वनविभागाचे कर्मचार्‍यासह रेस्क्यू टिम, दिलीप वेडेपाटील यांच्यासमवेत बिबट स्पॉट झालेल्या ठिकाणची विभागाने रविवारी (दि.१) सकाळी स्थळपाहणी केली. व्हिडिओ हा तेथील असल्याचे दर्शवून बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला आहे. बिबटच्या हालचालींवर लक्ष ठेवणेकामी काम चालू आहे. वनविभाग यंत्रणा बिबट जेरबंद करणे कामात प्रयत्न करीत असल्याचे विभागाने कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×