Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने १ लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव वितरण

दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न

marathinews24.com

मुंबई – राज्यात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा मिळवून देण्याकरिता शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आहेत. समाजातील सर्व घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे ध्येय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने व रतननिधी फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम अवयव व सहाय्यक साधन वितरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाद्वारे १ लाख दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून, हा अभिनव प्रकल्प दिव्यांग पुनर्वसनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

रसिकांनी अनुभवले लतादीदी, कवी ग्रेस यांचे दुर्मिळ स्मरणरंजन! – सविस्तर बातमी 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यासाठी अधिक प्रभावी कार्यवाही केली जात आहे . या उपक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करणे हा आहे. कृत्रिम हात, पाय, श्रवणयंत्रे, व्हीलचेअर्स आणि इतर सहाय्यक उपकरणे यांचा समावेश असलेला हा वितरण कार्यक्रम राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. रतननिधी फाऊंडेशनने राज्यातील बीड, चंद्रपूर, जळगाव, सोलापूर, पालघर, मुंबई, गडचिरोली, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये २९,४९६ सहाय्यक साधनांचे (जयपूर फूट, पोलिओ कॅलिपर्स, कृत्रिम हात व काठी) वितरण करून सुमारे २६ हजार दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन केले आहे.

जागतिक स्तरावर सुमारे १५ टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे, तर भारतात हा आकडा सुमारे २.२ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर रतननिधी फाऊंडेशनचा मोबिलिटी प्रकल्प दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आयुष्य जगण्याची उर्मी देणारा, आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×