मोबाईलचा वापर कमी करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

मोबाईलचा वापर कमी करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनानिमित्त ३०० विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम आणि पुस्तक वाचन करीत घेतली शपथ

marathinews24.com

पुणे – जागतिक डिजिटल डिटॉक्स दिनाच्या पूर्वसंध्येला (दि. ९) शिक्षण प्रसारक मंडळीच्या नू. म. वि. मराठी शाळेतील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम आणि पुस्तक वाचन करीत मोबाईलचा कमीतकमी वापर करण्याची शपथ घेतली. दि. १० डिसेंबर हा दिवस जागतिक डिजिटल डिटॉक्स दिन साजरा केला जातो. याचे निमित्त साधून ‘चला आपण डिजिटल डिटॉक्स होऊया आणि बालपणाचा खरा आनंद लुटू या’ अशा आशयाचा संदेश देणारे भव्य पोस्टर बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. मराठी शाळेतील पटांगणात लावण्यात आले होते. त्याभोवती एकत्र येत मोबाईलचा कमीतकमी वापर करण्याची सामूहिक शपथ घेतली. सुरुवातीस विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम केला.

ब्रेल लिपितील ५ पुस्तकांचे प्रकाशन – सविस्तर बातमी 

साईनाथ मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शाह यांनी उपक्रमाविषयी माहिती विशद केली. वर्ल्ड डिजिटल डिटॉक्सच्या संस्थापक रेखा चौधरी, सदस्या वैशाली चव्हाण, नू. म. वि.च्या शाला समितीचे अध्यक्ष पराग ठाकूर, साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शाह, गंधाली शाह, विजय चव्हाण, श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद थोरात, गोविंदा वरंदाणी, मुख्याध्यापिका अनुजा कांगणे, नू. म. वि. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश कांबळे, शिक्षिका वर्षा साबळे, नितीन शेंडे आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×