‘मोक्का’ कारवाईनंतर पसार झालेल्या सराइताला अटक

दीड वर्षे पोलिसांना चकवा देणारा मोक्का आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर गेले दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराइताला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अथर्व लक्ष्मीकांत राजमाने (वय २३, रा. ८८२, कसबा पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राजमाने याच्यासह साथीदारांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गेल्या वर्षी ‘मकोका’ कारवाई केली होती. ‘मोक्का’ कारवाई केल्यानंतर तो पसार झाला होता.

शस्त्र परवाना प्रकरणांच्या चौकशीचे पोलीस आयुक्तांचे आदेश – सविस्तर बातमी

सराईत राजमाने हा धायरीतील एका सोसायटीत ओळख लपवून राहत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी रहिम शेख, अमोल आवाड, मयूर भोकरे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. रामजाने याला वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, शेख, आवाड, भोकरे, लांडगे, सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, बालारफी शेख, नितीन बोराटे, सचिन माळवे, दयानंद तेलंगे, गीतांजली जांभुळकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×