Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जादा भाडे देण्याच्या आमिषाने मोटारींची लुट

आरोपीला बेड्या, ५ गाड्या जप्त

marathinews24.com

पुणे – सोशल मीडियाद्वारे मोटारींना जादा भाडे मिळवून देण्याची जाहिरात करून अनेकांना गंडा घालणार्‍या आरोपीला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुमित सुनिल कवडे (वय २७, रा. कवडेवाडी, कोरेगांव पार्क) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

महिलेचा शारिरिक आणि मानसिक छळ, गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

गुन्हातील आरोपी हा सोशल मिडीयावर जहीरातीद्वारे गाडी मालकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवुन त्यांची चारचाकी गाडी देण्यास भाग पाडत होता.त्यानंतर गाडी मालकाला कोणताही मोबदला अथवा गाडी परत न देता स्वतः गाडीचा वापर करीत होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सुमित सुनिल कवडे याला अटक केली. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी संगीता अल्फान्सो शिंदे, वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, एपीआय जितेंद्र खैरना, उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे, प्रविण पडवळ, सचिन पवार, राहुल मोकाशी, गौरव म्हस्के, राहुल वेताळ, अंकुश खंनसोळे, प्रदिप ठाकुर, सुनिल मारकड यांनी केली.

अनेकांना गंडा, फसवणूक केल्याचा संशय

आरोपीने बर्‍याच लोकांची अशाच पद्धतीने फसवुणक केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित फसवणुक केलेल्या गाड्यांबाबत तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध फसवणूक केलेबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×