गुंगारा देणारा हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात

गुंगारा देणारा हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – तरुणावर लोखंडी हत्याराने वार करून पसार झाल्यानंतर ५ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला बिबवेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. त्याला कुंभारवाडा येथून पकडण्यात आले. श्रेयश दिगंबर सोनवणे (वय १९, रा. सुपर बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बिबवेवाडी परिसरातील कुंभारवाडा परिसरात सोनवणे गांजा घेऊन थांबला होता. त्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिस अंमलदार विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, सुमित ताकपेरे, रक्षित काळे यांना मिळाली.

पंतंग उडवणे आले मुलाच्या जीवाशी – सविस्तर बातमी 

आरोपी श्रेयश सोनवणे गांजा घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरून पथकाने या भागात सापळा लावला. त्याला पकडून झडती घेतली असता त्याच्या गाडीत दीड किलो गांजा मिळून आला. सोनवणे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने जुलै महिन्यात एका तरुणावर विनाकारण हल्ला केला होता. लोखंडी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले होते. त्यानंतर पसार झाला होता. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याच्यावर पोलिसांनी आता एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनवणे सराईत गुन्हेगार आहे. त्याने गांजा विक्रीसाठी आणल्याचा संशय आहे. त्याने हा गांजा कोठून आणला, याबाबत पोलिस तपास करत आहेत. सराईत गुन्हेगारच अमली पदार्थांची तस्करी करू लागल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल माने, पोलिस अंमलदार संजय गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×