पाॅलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

पुण्यात निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक

चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आयुर्विमा पाॅलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाची २ लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ऑक्टोबर महिन्यात संपर्क साधला. ‘तुमची पाॅलिसी बंद पडली असून, परताव्यापोटी १२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल. त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल’, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ५७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×