बाणेर भागात लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय

लाॅज व्यवस्थापक अटकेत

marathinews24.com

पुणे – शहरातील बाणेर भागातील लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. बाणेर पोलिसांनी लाॅजवर छापा टाकून तरुणींची सुटका केली. कारवाईत लाॅज व्यवस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लाॅज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.

पुणे पोलीस आयुक्तांचे पीआरओ निलंबित; बडतर्फीची प्रक्रिया सुरू – सविस्तर बातमी

प्रकाश ज्ञानेश्वर गायकवाड (वय २४, सध्या रा. फलक इन लाॅज, लक्ष्मणनगर, बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाळू सुभाष चौधरी, अजितसिंग जितेंद्रपाल गाढोके, दलाल रोशन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई रोहित पाथरूट यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेरमधील लक्ष्मणनगर भागातील एका लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. आरोपींनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्याने देहविक्रय करण्यास प्रवृत्त केले. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी छापा टाकून लाॅजमधून तरुणींची सुटका केली. लाॅज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सगर, सहायक निरीक्षक लामखेडे, केकाण आणि पथकाने कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×