Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

संक्रातीचे वाण खरेदी करणाऱ्या महिलेचा विनयभंग

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मकर संक्रातीनिमित्त वाण साहित्य खरेदीसाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ३१ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात डॉक्टर ही असुरक्षित – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर संक्रातीनिमित्त तक्रारदार महिला बुधवारी (३१ डिसेंबर) शुक्रवार पेठेतील भुतकर हौद परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथील एका प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात त्यांनी मसाल्याचे डबे पाहिले. त्यांनी प्लास्टिक डब्याची किंमत विचारली. डब्याची किंमत कमी करा, असे त्यांनी विक्रेत्याला सांगितले. तेव्हा विक्रेत्याने महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधला. त्यानंतर महिलेने जवळच असलेल्या शुक्रवार पेठ पोलीस चौकीत तक्रार दिली. याप्रकरणी विक्रेत्याविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार येसादे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×