Breking News
ई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंदएकल महिलांना विकासात समान संधीसाठी सर्वांनी दृष्टिकोन सुधारावा – महापौर मंजुषा नागपुरेनोकरीच्या आमिषापोटी तरुणाने गमावले ४२ लाखपॉलिसीचे पैसे मिळवणे पडले महागातपालखी सोहळा अथ ते इथपर्यंतचा प्रवास – विशेष लेख

पुण्यात आंदोलन करणे भोवले; १० विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात आंदोलन करणे भोवले; १० विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत वयोमर्यादा वाढविण्यासाठी लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावर गुरुवारी रात्री अचानक आंदोलन, तसेच निदर्शने करणाऱ्या १० जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

कुख्यात निलेश घायवळ टोळीतील दोन गुन्हेगार अटकेत – सविस्तर बातमी 

नितीन बाबासाहेब आंधळे (वय ३०), लेशपाल चांगदेव जवळगे (वय ३२), दिग्विजय दिलीप पाटील (वय २३), वैभव रावसाहेब गुंजाळ (वय २५), शुभम राजेंद्र खाकाळ (वय २३), प्रवीण महादेव पाटील (वय ३२), अक्षय रंगराव कांबळे (वय ३०), देवराज युवराज ठोंबरे (वय २३), संकेत बंडू जवळगे (वय २५) आणि अजिनाथ बाबासाहेब केदार (वय ३८) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. पोलीस हवालदार सुरेंद्र नाकाडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या रविवारी (४ जानेवारी) पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (१ जानेवारी) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेवरून अचानक नवी पेठेतील लालबहाद्दुर शास्त्री रस्त्यावर आंंदोलन सुरू केले, तसेच निदर्शन करण्यास सुरुवात केली. आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळात तेथे शेकडो विद्यार्थी तेथे जमले.

आंदोलन सुरू केल्याने शास्त्री रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रस्त्यावर आंदोलन न करण्याची विनंती केली. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर आंदोलन सुरु ठेवल्याने पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी १० विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×