Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे बदलीसाठी घेतली ३ लाखांची लाच

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावे बदलीसाठी घेतली ३ लाखांची लाच

आरोग्य सेवक अटकेत

marathinews24.com

पुणे – बदलीसाठी ३ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. रामकिसन गंगाधर घ्यार (वय ४३) असे अटक करण्यात आलेल्या आरोग्य सेवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका आरोग्य सेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

सासरच्या छळामुळे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे आरोग्य सेवक आहे. जून २०२५ मध्ये त्यांची आरोग्य कार्यालय, उपसंचालक, कोल्हापूर येथील कार्यालयातून पुणे विभागात बदली झाली होती. मात्र, पुणे विभगात नियुक्ती न करता त्यांना आरोग्य सेवक पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी इंदापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथे रिक्त पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी बदलीचा अर्ज केला होता.

या प्रकरणात उपसंचालक आरोग्य, पुणे मंडळ कार्यालयातील आरोग्य अधिकाराऱ्या संपर्कात आरोपी रामकिशन घ्यार होता. बदलीचे काम करून देण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने २ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शुक्रवारी (२ जानेवारी) जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्यावर सापळा लावण्यात आला. घ्यार याने तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेतली. लाच घेताना त्याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×