Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील दीपबंगला चौकात चोरट्यंचा धुमाकूळ

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

दुकानांचा दरवाजा उचकटून रोकडचोरी

marathinews24.com

पुणे – दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, तसेच मोबाइल संच लांबविल्याची घटना माॅडेल काॅलनीतील दीपबंगला चौकात घडली. याच परिसरातील एका खासगी रुग्णालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत कपडे विक्रेत्याने फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजीविक्रेत्याकडे मागितली लाच; पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माॅडेल काॅलनीतील दीपबंगला चौकात तक्रादाराचे कपडे विक्रीचे दुकान आहे. तेथून काही अंतरावर वेताळबाबा चौक परिसरात उपाहारगृह आहे. चोरट्यांनी ६ डिसेंबर रोजी मध्यरात्री कपडे विक्री दुकानाचा दरवाजा उचकटला. गल्ल्यातील १० हजारांची रोकड चोरट्यांनी चोरली. शेजारी असलेल्या एका खासगी रुग्णालयाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी मोबाइल चोरून नेला. वेताळबाबा चौक परिसरातील एका उपाहारगृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील रोकड अणि मोबाइल असा १५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दीपबंगला चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, हवालदार शिर्के तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×