भाजीविक्रेत्याकडे मागितली लाच; पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा

भाजीविक्रेत्याकडे मागितली लाच; पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – अदखलपात्र गुन्ह्यात (एनसी) कारवाई न करण्यासाठी भाजी विक्रेत्याकडे पाच हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. भाजी विक्रेत्याकडे हवालदाराने सुरुवातीला १० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीत ५ हजार रुपयांची लाच देण्याचे तक्रारदाराने मान्य केले. मात्र, हवालदाराला संशय आल्याने त्याने लाच स्विकारण्यास नकार दिल्याने कारवाई होऊ शकली नाही.

डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी डोंगरे कुटुंबियांचे केले सांत्वन – सविस्तर बातमी 

विकास लक्ष्मण ओंबासे (वय ३९, रा. आनंदबाग सोसायटी, सोनोरी रस्ता, सासवड) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. भाजीपाला विक्रेत्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार हे सासवडमध्ये राहायला असून, त्यांचा तेथे भाजीपाला विक्री व्यवसाय आहे. तक्रारदार भाजीपाला विक्रेता आणि त्याच्या वडिलांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र (नाॅन काॅग्निजबल ऑफेन्स) गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यात कारवाई करणार नाही, तसेच मदत करण्यासाठी हवालदराने तक्रारदार भाजी विक्रेत्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीत पाच हजार रुपये देण्याचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानंतर सासवड पोलीस ठाण्यच्या परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. हवालदाराला पैसे देण्याासाठी भाजीपाला विक्रेता तेथे गेला. हवालदाराने तक्रारदाराला पोलीस ठाण्यात नेले. तेथील खोलीत तक्रारदाराची तपासणी हवालदाराने केली. लाच प्रकरणात कारवाई होणार असल्याचा संशय आल्याने त्याने पैसे घेण्यास नकार दिला. मात्र, हवालदाराने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ओंबासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सूहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×