Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण भोवणार

सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण भोवणार

पुणे पोलिसांचा सोशल मीडिया वॉच ड्राईव्ह

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांपासून पदाधिकार्‍यांपर्यंत सोशल मीडियावरील पोस्ट रंगात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने गुन्हेगारी प्रवृत्तींचे उदात्तीकरण करणारे मेसेज, व्हिडिओ पोस्ट करणार्‍या सोशल हँडलरवर पुणे पोलिसांच्या सोशल मीडिया सेलद्वारे वॉच ठेवला जात आहे. प्रामुख्याने कुख्यात गुंड बंडू आंदेकर, बापू नायर, गजा मारणे यांच्यासह इतर गुंडाच्या हस्तकांकडून सोशल पेजेसवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेसह इतर विभागही काम करीत आहेत.

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची २९ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुख्यात गुंडांच्या कुटूंबियांनी नामांकित राजकीय पक्षाची उमेदवारी मिळवून सोशल मीडियावर प्रचाराला गती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे पेज बनवून रॅली, प्रचार, भाषणांचे व्हिडिओज पोस्ट केले जात आहे. दरम्यान निवडणूकीसाठी रिंगणात उतरलेल्या कुख्यात गुंडांच्या हस्तकांनी खास हस्तकांद्वारे सोशल मीडिया हँडलरांची नियुक्ती केली असल्याचे पेजवरील व्हिडिओतून दिसून येत आहे. मात्र, अशाच काही गुन्हेगारांनी केलेल्या पोस्ट पुणे पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या नजरेत आल्या आहेत. त्याअनुषंगाने संबंधितांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनो अशाप्रकारे सोशल मीडियावरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोस्टसंदर्भात कमेंट, शेअरिंग करण्याआधी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गुंडांचे सोशल मीडिया हँडलर रडारवर

गुन्हेगारीचे उदात्तीकरण थोपवण्यासाठी पुणे पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या सोशल मीडिया हँडलर रडारवर घेतले आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वी कुख्यात बंडू आंदेकर याने उमेदवारी अर्ज भरताना नेकी का काम आंदेकर का नाम अशी घोषणाबाजी केली होती. त्याचाच आधार घेत एकाने आंदेकर कुटूंबियांसाठी सोशल मीडियावर पेज तयार केले. त्याद्वारे व्हिडिओ पोस्ट केली होती. त्यापार्श्वभूमीवर संबंधित हँडलरला धडा शिकवण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली आहे. तसेच कुख्यात गुंड गजा मारणे यानेही शहराबाहेर राहून मतदारांवर दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगानेही पोलिसांकडून आता खबरदारी घेतली जात आहे.

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस सज्ज असून, कायदा सुव्यवस्थेसह निवडणूक प्रक्रिया सुस्थिीत पार पाडण्यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. विशेषतः सोशल मीडियावरील वॉच, गुन्हेगारांचे कोम्बिंग ऑपरेशन, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर दिला आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला आहे.

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×