Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

किरकोळ वादातून शेजाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

गॅस सिलेंडर वाहतुकीवरून वाद; चालकाला धमकावून ‘पत्रकाराने मागितली ५ हजारांची खंडणी

येरवड्यातील यशवंतनग भागात घडली घटना 

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून शेजाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना येरवड्यातील यशवंतनग भागात घडली. याप्रकरणी एकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. हरिदास भगवान सातपुते (वय ४२, रा. यशवंतनगर, येरवडा ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक तुकाराम साठे (रा. यशवंतनगर, येरवडा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सातपुते यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खळबळजनक; १० वर्षाच्या मुलासोबत अश्लील कृत्य अन् मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते आणि साठे हे शेजारी आहेत. ६ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास यशवंतनगरमधील स्वच्छतागृहाजवळ दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादातून साठे याने सातपुते यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. सातपुते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×