Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

पुण्यात योगी उर्फ महाराजला अटक; आईस्क्रीम फॅक्टरीच्या नावखाली करत होता मेफेड्रॉनची तस्करी

पुण्यात योगी उर्फ महाराजला अटक; आईस्क्रीम फॅक्टरीच्या नावखाली करत होता मेफेड्रॉनची तस्करी

२५ लाखांचे एमडी जप्त

marathinews24.com

पुणे – शहरात आईस्क्रीम फॅक्टरीच्या नावाखली चक्क मेफेड्रॉनची तस्करी करणार्‍या राजस्थानातील तस्कराला अमलली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केले आहे. त्याच्याकडून तब्बल २५ लाख रूपयांचे एमडी जप्त केले आहे. संबंधित तस्कराची चंदननगर भागात आईस्क्रीम निर्मितीचा कारखाना असून, स्वतःच्या नशेसह इतरांना विक्रीसाठी तो एमडीची तस्करी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. रतननाथ मोहननाथ योगी (रा. सर्वे नं. २३, सोपान नगर, वडागांव शेरी पुणे, मूळ-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

केजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार – सविस्तर बातमी 

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थ तस्करांकडून गैरव्यवहाराची शक्यता होती. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथक दोनकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार संदिप देवकाते यांना योगी आईस्क्रीम सोपाननगर याठिकाणी असलेला आरोपी एमडी विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून योगी उर्फ महाराज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत २५ लाख रूपये आहे.

आरोपी योगी उर्फ महाराज मूळचा राजस्थानातील असून, त्याचा आईस्क्रीम बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र, काही महिन्यांपासून त्याला एमडी सेवनाचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो थेट राजस्थानमध्ये जाउन एमडी विकत घेउन पुण्यात आणत होता. त्यानंतर अतिशय जवळच्या तस्करांना एमडीची विक्री करीत असताना अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पकंज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे, शुभांगी म्हाळसेकर यांनी केली.

आईस्क्रीम फॅक्टरीच्या आडून संबंधित तस्कर मेफेड्रॉनची विक्री करीत होता. त्याला ताब्यात घेउन २५ लाखांचे एमडी जप्त केले असून, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबाइल, रोकड असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी त्याची आणखी चौकशी केली जात आहे.

सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×