Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

शेअर मार्केटद्वारे जादा परताव्याचे आमिष महागात

शेअर मार्केटद्वारे जादा परताव्याचे आमिष महागात

१० लाख ६८ हजारांचा गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १० लाख ६८ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १३ डिसेंबर ते ७ फेबु्रवारी २०२४ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक बँक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एपीके फाईलद्वारे घेतला मोबाइलचा ताबा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायला असून, १३ डिसेंबर २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो अशी बतावणी केली. तक्रारदाराचा विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना गुंतवणूकीला भाग पाडले. जवळपास १० लाख ६८ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×