Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

शहरात दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

बाणेर, हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलांचे दागिने चोरी

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीतील प्रचाराची धामधूम, तसेच शहरातील वेगवेगळ्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात असताना महिलांकडील दागिने हिसकाविणाऱ्या चोरट्यंनी धुमाकूळ घातला. बाणेर आणि हडपसर भागात चोरट्यांनी पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या. बाणेरमधील महापालिकेच्या सावित्री वर्किंग वुमेन्स हाॅस्टेलसमोर पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वरा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाकळ करण्यात आला आहे.

पुण्यात सोने पॉलिश करणाऱ्या बहाण्याने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ महिला बाणेर भागात राहायला आहेत. त्या बुधवारी (७ जानेवारी) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास बाणेर परिसरातून निघाल्या होत्या. सावित्री वर्किंग वुमेन्स हाॅस्टेलसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करत आहेत.

हडपसरमधील श्री काळूबाई मंदिरासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास हडपसर गावातील श्री काळूबाई मंदिरासमोरुन निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने् हिसकावून नेले. महिलेने आऱडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×