Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

सायबर चोरट्यांचा जेष्ठ महिलेला ९ लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांचा जेष्ठ महिलेला ९ लाखांचा गंडा

महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅसबील भरणा थकबाकी असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेला एपीके फाईल पाठवली. त्यांना फाईल उघडण्यास भाग पाडून, सायबर चोरट्यांनी मोबाइलचा ऑनलाईन ताबा घेतला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ९ लाख १३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ कालावधीत पर्वतीत घडली. याप्रकरणी महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

महिलेचे सोन्याचे दागिने चोरले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पर्वती परिसरात राहायला असून, २३ सप्टेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. तुमचे गॅसबील भरणा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठवून उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर महिलेच्या मोबाइलचा ताबा घेउन सायबर चोरट्यांनी महिलेच्या बँकखात्यातील ९ लाख १३ हजारांची रोकड इतर बँक खात्यात वळवून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×