Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

बापच ठरला लेकीसाठी नराधम

बापच ठरला लेकीसाठी नराधम

मुलीवर बलात्कारप्रकरणी जन्मदात्यास ७ वर्ष कारावास

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापानेच वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार आणि सबळ पुराव्यामुळे आरोपी पित्यास ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान याप्रकरणाचा शिरूर पोलिसांनी संवेदनशील आणि शिस्तबध्दपणे तपास केला होता. त्यांच्या याच तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळाली आहे.

मुलीशी अश्लील कृत्य करणारा रखवालदार गजाआड – सविस्तर बातमी 

शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षाचा अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापाकडूनच वारंवार अत्याचार सुरु होता. याप्रकरणी १८ ऑगस्ट २०२४ रोजी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. तपासादरम्यान पीडितेचा जबाब, साक्षीदारांचे जबाब, महत्वाचे पुरावे पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गोळा केले होते. न्या.एस.एस.घोरपडे (विशेष सत्र न्यायालय) यांनी सर्व पुरावे आणि जबाब ग्राह्य धरत आरोपी बापाला ७ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केला. सरकारी पक्षातर्फे एस. बी. तिडके यांनी काम केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×