कात्रज भागात दुकानातून ६० हजारांचा ऐवज चोरी

येवलेवाडी अन मुंढव्यात ४६ लाखांची घरफोडी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात दुकानांचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी कात्रजमधील किराणा माल दुकानाचे कुलूप तोडून रोकड, तसेच दागिने असा ६० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी दीप बंगला चौकातील तीन दुकाने फोडून रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे कोंढव्यातील शांतीनगर परिसरात राहायला आहेत. त्यांचे कात्रज भागातील सुखसागरनगर भागात किराणा माल दुकान आहे. चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड, तसेच दुकानातील देव्हाऱ्यात ठेवलेले सोने-चांदीच्या वस्तू असा ऐवज लांबविला. शनिवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुकानांचा दरवाजा उचकटून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ओैषध विक्री, किराणा माल, तसेच मद्य विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×