खोपोलीतील मंगेश काळोखे खून प्रकरण; दुसरा आरोपी पुण्यातून अटकेत

गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – खोपाेलीतील शिवसेनेच्या नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणात पसार असलेल्या दुसऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. अरबाज उर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी हडपसर भागातील हांडेवाडी परिसरातून मंगेश काळोखे खून प्रकरणातील आरोपी खलिद खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) याला अटक करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यातून काळोखे यांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. काळोखे यांच्या खुनासाठी कुरेशी याने २० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. त्याने दोन मित्रांशी संगनमत करुन काळोखे यांचा खून केला होता.

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या – सविस्तर बातमी

हडपसरमधील काळेपडळ परिसरात झालेल्या एका गंभीर गुन्ह्यात आरोपी अरबाज शेख हा पसार झाला होता. तो विश्रांतवाडीतील पीएमपी थांब्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस कर्मचारी नासीर देशमुख यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने काळोखे खून प्रकरणात सामील असल्याची माहिती पोलिसांना दिली. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस कर्मचारी नासीर देशमुख, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, अमर चव्हाण, गणेश माने, परमेश्वर कदम यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×