Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

बकोरी रस्ता, वाघोली परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देवेंद्रराम शेट्टी (वय ४०, रा. कल्पतरु पार्क, बकोरी रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. शेट्टी यांचा भाऊ मंजुनाथ (वय ३५) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओचे बनावट चलन पाठवून केली फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार देवेंद्र हे पुणे-अहिल्यानगर मार्गावरुन ३ डिसेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले होते. केसनंद फाटा परिसरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार देवेंद्र यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवेंद्र यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी केसनंद फाटा परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×