Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात अपघात

marathinews24.com

पुणे – प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी बस चालकाला अटक केली. हर्ष लाड असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात करण अमित जाधव (वय २१, रा. कल्पतरु सोसायटी, बोरीवली, मुंबई) जखमी झाला. याप्रकरणी प्रवासी वाहतूक करणारा बस चालक जयवंत हरिभाऊ बोरेकर (वय ४६, रा. खडकी बुद्रुक, ता.मंगळूरपीर, जि. अकोला) याला अटक करण्यात आली. करण जाधव याने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

होळकर पुलावर वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास हर्ष लाड आणि त्याचा मित्र करण जाधव हे दुचाकीवरुन नगर रस्त्यावरुन निघाले होते. येरवड्यातील शास्त्रीनगर चौकातील सिग्नलला ते थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात हर्ष आणि त्याचा मित्र करण हे जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या हर्ष आणि करण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच हर्षचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर बस चालक बोरेकर याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×